नुसती बडबड नको, आजच्या आज ठराव करा अन्... : उध्दव ठाकरे

नुसती बडबड नको, आजच्या आज ठराव करा अन्... : उध्दव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सभागृहात उपस्थित राहून सीमावादावर आक्रमक भूमिका मांडली.

नागपूर : कर्नाटक सरकारने नुकताच विधीमंडळात सीमाप्रश्नी ठराव संमत केला. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटलेले पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सभागृहात उपस्थित राहून सीमावादावर आक्रमक भूमिका मांडली. एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने मांडली आहे. तशी धमक आपल्यामध्ये आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

नुसती बडबड नको, आजच्या आज ठराव करा अन्... : उध्दव ठाकरे
अब्दुल सत्तारांच्या मागणीने कृषी आयुक्तालयात खळबळ; कृषी महोत्सवासाठी मागितले तब्बल 'इतके' कोटी

उध्दव ठाकरे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. एवढाच काळ किंवा यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसं मराठीत बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण विरोधी पक्षात आलं की पेन ड्राईव्ह द्यावे लागतात, अशी एक पद्धत झाली आहे, असा निशाणा त्यांनी यावेळी भाजपवर साधला आहे.

या पेन ड्राईव्हमध्ये महाराष्ट्र सरकारने केलेली केस फॉर जस्टीस ही फिल्म आहे. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी. सोबत महाजन रिपोर्टचा चिरफाड करणारे बॅरिस्टर अंतुले यांचे पुस्तकही सदस्यांना उपलब्ध करून द्यावे. म्हणजे लोकांवर भाषिक अत्याचाराची पकड कशी घट्ट होत आहे. ते या कळेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र वाद सुप्रीम कोर्टात आहे. त्याचा निकाल लागत नाही. तोपर्यंत कर्नाटकामध्ये जी मराठी भाषिक गाव आहेत. बेळगाव, निपाणी, कारवारसह इतर गावांना केंद्रशासित प्रदेश करावे असा प्रस्ताव आणावा, अशी मागाणी उद्धव ठाकरे विधानपरिषदमध्ये केली आहे. नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमाभाग केंद्राने ताब्यात घ्यावा, असाच ठराव असला पाहिजे. आजच्या आज ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, अशी आग्रही मागणी उध्दव ठाकरेंनी केली आहे.

नुसती बडबड नको, आजच्या आज ठराव करा अन्... : उध्दव ठाकरे
संजय राऊतांचं नाणं आता जुनं झालंयं, ते काही आता...; भरत गोगावलेंचा निशाणा

तसेच, एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने मांडली आहे. तशी धमक आपल्यामध्ये आहे का? आपण तशी भूमिका मांडू शकतो का? कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात एका पक्षाचे सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपला नेता मानतात. आपले मुख्यमंत्री दिल्लीत जातात. ते या विषयावर बोलणार आहेत का, असा सवाल उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मराठी भाषिकांनी कन्नड भाषिकांवर किती अन्याय केला? महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवर किती अन्याय केला? आपण कन्नड भाषिकांवर अन्याय केला नाही. पण, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर सातत्याने अत्याचार करत आहे. त्याविरोधात आपण भूमिका घेणार आहोत की नाही? आम्हीही सीमावाद प्रश्नी लाठ्याकाठ्या खाल्ल्या होत्या, असं शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटलं होतं. यावर तुम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. आता सीमापार गेला. आता तिकडे गेला म्हणून बोलायचं नाही असं नाही, असा टोला उध्दव ठाकरेंनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com