सावरकर आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही; उध्दव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

सावरकर आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही; उध्दव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी वीर सावरकरांचे नाव घेत मोदी सरकारवर टीका केली होती. याचा समाचार उध्दव ठाकरेंनी सभेत घेतला.

नाशिक : खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत, अशी टीका मोदी सरकार केली होती. यावर उध्दव ठाकरेंनी भाष्य केले आहे. राहुल गांधींना जाहीरपणे सांगतो ही लढाई लोकशाहीची आहे. पण, सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशाराच उध्दव ठाकरेंनी राहुल गांधींना दिला आहे.

सावरकर आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही; उध्दव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा
उध्दव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान; हिंमत असेल तर ठाकरेंपासून शिवसेना...

मालेगावमध्ये आज उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. यावेळी ते म्हणाले, राहुल गांधींना जाहीरपणे सांगतो ही लढाई लोकशाहीची आहे. पण, सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सावरकरांनी जे केलं ते येड्यागबाळ्याचं काम नाही. 14 वर्ष त्यांनी छळ सोसला. आपण एकत्र आलो आहोत ती लोकशाही वाचविण्यासाठी. आपल्याला तोडण्याच काम केलं जातंय. आता वेळ चुकली, तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

2024 साली निवडणुकीत तुम्ही त्यांना बसविले. तर तिथून पुढे निवडणूक होणार नाही. भाजपचे सावरकर भक्त आहे त्यांना सांगतो तुम्ही अंधभक्त होऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ही लढाई देशाची, शेतकऱ्यांची आहे. ज्यांचं आपल्या स्वातंत्र्यामध्ये तीळभर संबंध नाही ते स्वातंत्र्य गिळायला निघाले आहे, अशी जोरदार टीका उध्दव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

यांच्या नेत्यावर आरोप केला तर भारताचा अपमान होतो. पंतप्रधान मोदी म्हणजे भारत... मान्य आहे का तुम्हाला? तुमच्या कुटुंबियांवर बोलल्यावर पोलीस कारवाई करतात. जस तुमचं कुटुंब तुम्हाला प्यार तस आमचं आम्हाला आहे. मी मुख्यमंत्री असल्यापासून दाखवा मी हिंदुत्व सोडले. शेंडी-जनव्याच हिंदुत्व मला मान्य नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अनिल देशमुखांना आता टाकलं. त्यांच्या 5 वर्षाच्या नातीची चौकशी केली. लालू प्रसाद यादव यांच्या घरातल्या गर्भवती सूनेची चौकशी केली. तुमच्या व्यासपीठावर साधू संत असायचे त्यांची शिकवण गेली कुठे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. बर झाले तुम्ही सांगितले निरमा पावडर आहे शुद्ध करतो. म्हणून हे सगळे गुजरातला गेले वशिंग मशीनमध्ये धुवून आणले. पहिले तुमच्या पक्षाचे नाव बदला भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही तर भ्रष्ट झालेली पार्टी, अशीही टीका उध्दव ठाकरेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com