राजकारण
Jalna Maratha Reservation Protest : उद्धव ठाकरे आज जालन्याला जाणार; आंदोलकांना भेटणार
जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज सायंकाळी जालन्याला जाणार आहेत. ते अंबड आणि आंतरवाली सराटी या गावांना भेट देणार आहेत. मराठा आंदोलकांना ते भेटणार आहेत. पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. उद्धव ठाकरे पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांना अंबड शासकीय हॉस्पिटलमध्ये भेटणार आहेत.