उद्धव ठाकरे 'या' लोकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

उद्धव ठाकरे 'या' लोकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व जोरदार तयारी करत आहेत. यातच आता ठाकरे गटाची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीचा तिसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. आज उद्धव ठाकरे घेणार भिवंडी आणि पालघर मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.

पालघरचे खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी पालघर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. तर दुसरीकडे भिवंडीचे भाजप खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मतदारसंघाचा देखील आढावा ते घेणार आहेत.

या बैठकीला संपर्कनेते स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, स्थानिक आमदार खासदार, माजी आमदार खासदार, उपजिल्हप्रमुख, विधानसभाप्रमुख, विधानसभासंपर्कप्रमुख उपस्थित असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com