महाराष्ट्र प्रेम सरकारमध्ये आहे की नाही;  बोम्मईंच्या फेक ट्वीटवरून उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र प्रेम सरकारमध्ये आहे की नाही; बोम्मईंच्या फेक ट्वीटवरून उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादातील ते ट्विटर अकाऊंट नसल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागील काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते ट्विटर अकाऊंट नसल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्र प्रेम सरकारमध्ये आहे की नाही;  बोम्मईंच्या फेक ट्वीटवरून उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल
लो कर लो बात, संपादक इतका अज्ञानी कसा; राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका

उध्दव ठाकरे म्हणाले की, 15-20 दिवस हा प्रश्न चिघळला होता. मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅक झाले होते तर, खुलासा करायला इतके दिवस का लागले. अटक प्रत्यक्ष झाल्या होत्या, महाराष्ट्रातल्या वाहनांना प्रत्यक्ष बंदी झाली. हे ट्वीटरवर झालं नव्हतं. मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे. हा खुलासा करण्यासाठी दिल्लीत बैठक बोलवेपर्यंत का थांबला होता? प्रत्येकवेळी कर्नाटककडून विषय चिघळवला जातो. महाराष्ट्र प्रेम सरकारमध्ये आहे की नाही,, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायलयात प्रश्न प्रलंबित असताना दोन्ही राज्यांनी काही करू नये, हा सल्ला काही नवीन नाही. सर्वोच्च न्यायलयात प्रश्न प्रलंबित असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रानेच थांबायच का? या गोष्टींचा नुसता उहापोह करून पोहे खाऊन निघणार असतील तर त्याला काही अर्थ नाही. कालच्या बैठकीत नवीन काय झाले, असेही त्यांनी म्हंटले आहे. हे ट्वीट म्हणजे जखमेवर मीठ चोळलं आहे. आपले मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होयबा करून आले, अशी टीका उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

महाराष्ट्र प्रेम सरकारमध्ये आहे की नाही;  बोम्मईंच्या फेक ट्वीटवरून उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल
आम्हाला राजकारण करायचं नाही; एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक ट्वीट केल्यानंतर सीमाभागांत तणाव वाढला. मात्र, बनावट ट्विटर खात्यावरून विधाने प्रसारित झाल्याचा दावा बोम्मई यांनी बैठकीत केला. मात्र आता ज्या ट्विटर अकाऊंट्सवरुन ही ट्वीट केली गेली ती खोटी असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही केला आहे. ही खाती उघडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही शहांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com