जळगावात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; सभेआधीच वातावरण गरम

जळगावात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; सभेआधीच वातावरण गरम

मंत्री गुलाबराव पाटलांसह जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंची आज भव्य जाहीर सभा होणार आहे.

जळगाव : जळगावात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. मंत्री गुलाबराव पाटलांसह जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंची आज भव्य जाहीर सभा होणार आहे. पाचोरा येथील सावा मैदानात सायंकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार असून या सभेत खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे, शुभांगी पाटील यांच्यासह ठाकरे गटाचे सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

जळगावात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; सभेआधीच वातावरण गरम
पुलवामा खुलाशावर पंतप्रधान मोदींचा मौनी बाबा नक्की का झाला? राऊतांचा रोखठोक सवाल

जळगावात उध्दव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. परंतु, यापुर्वीच जळगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं अन्यथा सभेत घुसणार, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता. यावर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. जळगाव आमचा आहे. शिवसेनेचा आहे. जळगावात आम्ही घुसलो आहे. काल आम्ही शोधत होतो. कोणता उंदीर घुसलाय का? गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गँग, असे राऊत म्हणाले. या पार्श्वभूमीवर आता उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com