Uddhav Thackeray | BBC News
Uddhav Thackeray | BBC NewsTeam Lokshahi

'जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू' बीबीसी कार्यलयावरील धाडीवर ठाकरेंची प्रतिक्रिया

एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावरती धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना आज शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रायगड मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बीबीसीच्या कार्यालयावर पडलेल्या धाडीवर देखील भाष्य केले आहे.

Uddhav Thackeray | BBC News
IT Raid on BBC: बीबीसीच्या दिल्ली कार्यालयात आयकर विभागाचे छापे

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मी तुमच्याशी बोलत असताना आता चॅनेल आणि माध्यमं इथे आहेत. खरं म्हटलं तर आपण लोकशाहीचे जे काही चार स्तंभ म्हणतो, न्याय व्यवस्था, प्रशासन, त्याच्यात आणखी एक स्तंभ असतो तो म्हणजे माध्यम, मी तुमच्याशी बोलत असताना तिकडे बीबीसीच्या कार्यालयावर धाड पडलेली आहे आणि धाड टाकलेली आहे. ही सुद्धा बातमी सुरू असेल कारण मी टीव्ही आता बघितलेला नाही. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावरती धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं. म्हणजेच काय आम्ही वाटेल ते करू पण तुम्ही आवाज उठवायचा नाही.

जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू, ही जी पाशवी वृत्ती आपल्या देशात फोफावायला बघतेय. ती आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही, तर उद्या संपूर्ण देश खाऊन टाकेल, त्या वेळेची लढाई ही स्वातंत्र्याची होती. आता स्वातंत्र्य टिकवण्याची ही लढाई आहे. गुलामगिरी ही गुलामगिरीच असते मग ती स्वकीयांची असो किंवा परकीयांची असेल, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com