मी नसलो तरी चालेल, पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे; उध्दव ठाकरेंची साद

मी नसलो तरी चालेल, पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे; उध्दव ठाकरेंची साद

महाविकास आघाडीची आज संयुक्त बैठक झाली. यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते.

मुंबई : निवडणुकींचा पत्ता नाही. दिवस ढकलायचे आणि देशात निवडणुकाच होणार नाही. पण, जर लोकशाही टिकवायची असेल तर सर्वसामान्य माणसाला देखील पुढे यावं लागेल. निवडणूका येतील आणि जातील पण ही निवडणूक जर हरलो तर मग 2024ची निवडणूक ही शेवटची असेल. मी नसलो तरी चालेल पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, अशी भावनिक साद ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी घातली आहे. महाविकास आघाडीची आज संयुक्त बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

मी नसलो तरी चालेल, पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे; उध्दव ठाकरेंची साद
तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली आम्ही मुसंडी; फडणवीसांचे आठवले स्टाईल अजित पवारांना उत्तर

एकतर भाजपात नाहीतर तुरुंगात अशी परिस्थिती आज आहे. आपली जी ताकत आहे ती मोदी नाही महाराज बघत आहेत. ही लढाई शिवसेनेची नाही आपल्या सगळ्यांची आहे. मला देवावर, न्यायदेवावर विश्वास आहे. चार स्तंभांपैकी एकाची विल्हेवाट लागली आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी असते तरी ती आपल्या देशात लोकशाहीचं वस्त्रहरण होणार नाही. जर मोदी म्हणजे देश असेल मग भारत माता कुठे आहे, असा सवाल उध्दव ठाकरेंनी विचारला आहे.

गावात, घरात जाऊन जे बोलायचं आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. आता निवडणुकींचा पत्ता नाही. दिवस ढकलायचे आणि देशात निवडणुकाच होणार नाही. पण, जर लोकशाही टिकवायची असेल तर सर्वसामान्य माणसाला देखील पुढे यावं लागेल. मला अनेकांना विचारलं होतं तुम्हांला माहित होतं ना मग का होऊ दिलं? मला विकाऊ माणसं नाही तर लढाऊ माणसं हवी आहेत. ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.

जुनी पेन्शन योजनेला पाठिंबा दिला. कारण आपण सरकार चालवत होतो तेव्हा कोरोना होता. तेव्हा माझं कौतुक करत होते, मला वाटलं माझा निरोप समारंभ करत आहेत की काय? आता तर माझ्यापाठी महाशक्ती उभी आहे. पंचामृत कोणी लस्सीसारखं पीत नाही. पंचामृत अगदी थोडस देतात आणि मग आपल्याकडे थोडंसं काहीतरी कर्मचाऱ्यांना पण द्यायला हवं होतं. आपल्याकडे उज्वला योजना सुरु आहे. पण, गॅस सिलेंडर मिळतोय का? गाडी दिली आहे पण पेट्रोल दिलं का? आता ते आम्हाला बदनाम करत आहेत. माझं आव्हान आहे की कोरोना काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवा. आपण प्रेतांची विटंबना केली नाही. वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर घणाघात केला आहे.

भाजपने हिंदुत्व कधी स्वीकारलं? रथयात्रा लालकृष्ण अडवाणी यांनी सुरु केली. तेव्हा अडवाणी पंतप्रधान झाले असते. हिंदुत्व म्हणजे धोतर नाही कधीही नेसलं आणि कधीही सोडलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पण आताच सरकार काय करत आहे हा प्रश्न सगळ्यांना माहित आहे. निवडणूका येतील आणि जातील पण ही निवडणूक जर हरलो तर मग 2024ची निवडणूक ही शेवटची असेल. मी नसलो तरी चालेले पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, अशी भावनिक साद उध्दव ठाकरेंनी घातली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com