Urfi Javed | Chitra Wagh
Urfi Javed | Chitra Wagh Team Lokshahi

वाद थांबेना! उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचले; म्हणाली, चित्रा ताई.....

‘मेरी डीपी धांसू, चित्रा मेरी सासू’ असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
Published by :
Sagar Pradhan

आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद मागील काही दिवसांपासून अधिकच चर्चेत आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी विरुद्ध तक्रार केल्यानंतर ती प्रकाशझोतात आली. दरम्यान, त्या दोघींमधला वाद आता शिंगेला पोहचला आहे. चित्रा वाघ यांच्या आक्षेपांनंतर उर्फीचे त्यांना डिवचण्याचा सत्र सुरुच ठेवले आहे. चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये सध्या ट्विटर वाद सुरू आहे. काल तिने ट्विटमधून वाघ यांना डिवचलं होते. आज आता पुन्हा उर्फीने एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तिने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना टोमणा मारला आहे.

याआधी काल देखील उर्फीने चित्रा वाघ यांना सासू म्हणून डिवचलं आहे. ‘मेरी डीपी धांसू, चित्रा मेरी सासू’ असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. उर्फी आजच्या ट्विटमध्ये म्हणाली की, "चित्रा ताई तू मेरी खास है फ्युचर मध्ये होणारी तू माझी सासू आहे" असे ट्विट तिने आज केले आहे. सोबतच दुसऱ्या ट्विटमध्ये ती म्हणाली की, उर्फी जावेद ला दिला त्रास,चित्रा असी कासी तूं गा सास... असे म्हणत आज पुन्हा एकदा तिने चित्रा वाघ यांना डिवचले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com