Vasant More : वंचितला धक्का! वंचितचे वसंत मोरे शिवसेना UBTत करणार प्रवेश

वंचितचे वसंत मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार आहे.

वंचितचे वसंत मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी 12 वाजता हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेशाआधी वसंत मोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. लोकसभेआधी वंचितमध्ये गेलेले वसंत मोरे विधानसभेआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज प्रवेश करत आहेत.

पुण्यातून शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह वसंत मोरे मुंबईकडे रवाना झाले आहेत. वसंत मोरेंसोबत 10 ते 12 मनसे शाखा अध्यक्षही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच वसंत मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती आणि अखेर त्यांचा हा प्रवेश होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com