वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले, मी पुन्हा पक्ष कार्यालयात जाणार नाही

वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले, मी पुन्हा पक्ष कार्यालयात जाणार नाही

राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांच्या नाराजीच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. अशातच अजित पवार यांनी थेट मोरेंना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली.

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक व नगरसेवक वसंत मोरे यांच्या नाराजीच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. अशातच विराधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मोरेंना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली. यामुळे वसंत मोरे मनसेची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंना मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावले होते. या भेटीनंतर वसंत मोरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले, मी पुन्हा पक्ष कार्यालयात जाणार नाही
...तर आज माझी मुलगी जिवंत असती; श्रध्दाच्या वडीलांची भावनिक प्रतिक्रिया

वसंत मोरे म्हणाले की, अमित ठाकरेंनी बोलावले होते. तब्बल 40 मिनिटे चर्चा झाली. माझी बाजू मांडली असून अडचणी मांडल्या आहेत. आता कोअर कमिटी यांच्याशी अमित ठाकरे बोलणार आहेत. माझी बाजू अमित ठाकरे यांनी ऐकली आहे. हे सर्व आता अमित ठाकरेंनी राज ठाकरे यांना सांगितले. यातून मार्ग निघेल. राज ठाकरेही भेटीसाठी बोलावतील. अमित ठाकरे यांच्यासोबत पहिल्यांदा चाळीस मिनिटे बोलताना भावूक झालो, असेही त्यांनी सांगितले.

माझा इगो दुखावत नाही. कोअर कमिटी मीटिंग कुठेही घ्या. पण, शहर कार्यालय सोडून स्मशानभूमीत घ्या. मी येतो. जिथं फुले सोडून काटे झाले. जिथे मोरे यांचे पद गेल्यावर गुलाल उधळण केली जाते. त्या पक्ष कार्यालयात मी जाणार नाही. शंभर टक्के वसंत मोरे यांच्या बाबतीत कारस्थाने झाली. त्या कार्यालयात मी जाणार नाही, असा निर्धारही केल्याचे त्यांनी सांगितले.

वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले, मी पुन्हा पक्ष कार्यालयात जाणार नाही
राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार; वसंत मोरे म्हणाले, आमच्याही अंगाला लाल माती लागलेली, पण...

राष्ट्रवादीच्या ऑफरबाबत विचारले असता वसंत मोरे म्हणाले, माझ्या मनात काहीच नाही. ऑफर येतात. पण, मला जायचे असते तर गेलो असतो. इतर पक्ष घेण्यास इच्छुक असतील तर माझा दोष नाही.

दरम्यान, वसंत मोरे यांनी एका विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. अजित पवार म्हणाले की, तात्या कधी येता... वाट पाहतोय, असे म्हणत अजित पवार यांनी मोरेंना खुली ऑफरच दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com