तात्या कधी येताय... वाट पाहतोय', अजितदादांची वसंत मोरे यांना ऑफर

तात्या कधी येताय... वाट पाहतोय', अजितदादांची वसंत मोरे यांना ऑफर

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे समजते.

वसंत मोरे यांनी एका विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. अजित पवार म्हणाले की, तात्या कधी येता... वाट पाहतोय. असे म्हणत अजित पवार यांनी मोरेंना खुली ऑफरच दिली आहे.

आगामी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Election) निवडणुकीपूर्वी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यानं मनसेचं टेन्शन वाढणार आहे. अजितदादांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com