Prakash Ambedkar
Prakash AmbedkarTeam Lokshahi

'पुढील 15 दिवसात महाराष्ट्रात दोन मोठे राजकीय स्फोट होणार' प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

संजय राऊत यांनी सामन्यातील रोखठोकमधून फोडाफोडीचे राजकारण सीझन-2 असे विधान केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Published by :
Sagar Pradhan

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर दुसरीकडे आज शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी सामन्यातील रोखठोकमधून फोडाफोडीचे राजकारण सीझन-2 असे विधान केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रात पुढील 15 दिवसात 2 मोठे स्फोट होईल. असे विधान त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केले आहे.

Prakash Ambedkar
राऊतांना दुसऱ्याच्या घरात डोकावायची जास्त सवय; आशिष शेलारांचा टोला

नेमकं काय केला आंबेडकरांनी गौप्यस्फोट?

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे एका पुस्तक प्रकाशनासाठी आंबेडकर आले होते.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पंधरा दिवसांमध्ये बरचं मोठे राजकारण महाराष्ट्रात घडेल. त्यामुळे आपण पंधरा दिवसांची वाट पाहू. त्यामुळे पंधरा दिवस थांबा. त्यानंतर पत्रकारांकडून हा स्फोट कुठे होणार? त्यावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात दोन ठिकाणी स्फोट होईल. हा स्फोट संपूर्ण देशात होईल. त्यामुळे मी एवढच सांगेल वाट पाहा. असे सूचक विधान करत प्रकाश आंबेडकरांनी गौप्यस्फोट केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com