Tabassum Govil Death
Tabassum Govil DeathTeam Lokshahi

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन, वयाच्या 78 व्या वर्षी दिला जगाला निरोप

1947 मध्ये मेरा सुहाग या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती.
Published by  :
Sagar Pradhan

हिंदी चित्रपट श्रुष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी जगाला निरोप दिला आहे. तबस्सुम गोविल यांना शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी त्यांचं निधन झाले. तबस्सुम यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले होते.

शुक्रवारी रात्री तबस्सुम यांना दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले होते. रात्री 8.40 वाजता तबस्सुम यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर 8.42 वाजता दुसरा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. आजच मुंबईमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com