छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत  महाडिक गटाची विजयी सलामी; सतेज पाटलांना धक्का

छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गटाची विजयी सलामी; सतेज पाटलांना धक्का

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. निवडणुकीत सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाडिक गटाने विजयी सलामी दिली असून माजी आमदार महादेवराव महाडिक संस्था गटातून विजयी झाले आहेत. विरोधी गटातील सचिन पाटील यांचा महाडिक यांनी पराभव केला

छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत  महाडिक गटाची विजयी सलामी; सतेज पाटलांना धक्का
Barsu Refinery Project शेतकऱ्यांचे सर्व गैरसमज दूर केले जातील; उद्योगमंत्र्यांची प्रतिक्रिया

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीसाठी 91 टक्के मतदान झाल्यानंतर आज रमणमळा याठिकाणी मतमोजणीला करण्यात आली. यामध्ये विरोधी गटातील सचिन पाटील यांचा पराभव करत माजी आमदार महादेवराव महाडिक संस्था गटातून विजयी झाले आहेत. महादेव महाडिक यांना 83 मते पडली. तर, सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. यामुळे सतेज पाटलांना मोठा झटका बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com