'गृहमंत्री स्वतःच्या पक्षातील राम कदमांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का?'

'गृहमंत्री स्वतःच्या पक्षातील राम कदमांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का?'

राम कदम यांनी कंबलवाले बाबांना बोलावून मतदारसंघातील लोकांवर उपचार केल्याची घटनी समोर आली आहे. यावर विद्या चव्हाण यांनी टीकास्त्र डागले आहे.

मुंबई : राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा असताना देखील असे प्रकार घडतातच कसे? राज्यात पोलीस नाहीत का? कंबलवाला बाबा महिलांसोबत करत असलेले कृत्य हे निंदनीय आहे. पोलिसांनी यासंदर्भात कंबलवाला बाबा आणि आयोजकांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. तसेच, या घटनेचा निषेध देखील व्यक्त केला आहे.

'गृहमंत्री स्वतःच्या पक्षातील राम कदमांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का?'
राम कदमांसारखे अंधश्रद्धेत अखंड बुडून गेलेले पामर जीव...; सुषमा अंधारेंचा घणाघात

कंबलवाला बाबा यांच्याकडून करण्यात येत असलेल्या बुवाबाजीचे प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावे. तसेच, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील आमदार राम कदम यांच्याकडून असे प्रकार होत आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. परंतु, हे कोण करणार, असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे, असे विद्या चव्हाण यांनी म्हंटले आहे.

राम कदम यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना जर याचा फायदा झाला असेल तर राम कदम बुवाबाजीच्या नादाला लागले आहेत. जर यामधून महिलांची छेडछाड होत असेल तर पोलीस जर कारवाई करत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस अशा भोंदुगिरी करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याकरिता समर्थ आहे. तसेच भोंदू बाबा आणि आयोजक यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर, पोलीस स्टेशनसमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

राज्यामध्ये 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात आधी गारपीट, अवकाळी पाऊस आणि आता दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी संकटात आला आसस्ताना मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकरिता मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये 32 हजार प्रतिदिवसीय भाड्याने रूम बुक करतात आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रचंड खर्च केला जातो. मुंबईत सुद्धा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणावळी आणि मीटिंग घेतल्या जातात. ही नवीनच संस्कृती शिंदे सरकारने आणली आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल असतांना अशाप्रकारे पैशाची उधळण होत आहे. मुख्यमंत्री नगर विकास मंत्री असल्यामुळे अशा प्रकारचे पैशाचे उधळण करण्याची त्यांची सवय असेल, असेही विद्या चव्हाण यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com