Vijay Wadettiwar : केंद्रीय यंत्रणांचा अशोक चव्हाणांच्या मागे ससेमिरा लावायचं काम सुरु झालं होते

Vijay Wadettiwar : केंद्रीय यंत्रणांचा अशोक चव्हाणांच्या मागे ससेमिरा लावायचं काम सुरु झालं होते

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Published by :
Siddhi Naringrekar

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

याच पार्श्वभूमीवर आज अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता हा पक्षप्रवेश असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी काँग्रेस सोबतच राहणार. काँग्रेसने मला खूप काही दिलेलं आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत होणार आहे. प्रभारींसोबत सविस्तर चर्चा होणार असून 16 आणि 17 फेब्रुवारीला काँग्रेसचं शिबिर आहे. केंद्रीय यंत्रणांचा अशोक चव्हाणांच्या मागे ससेमिरा लावायचं काम सुरु झालं होते. अशोक चव्हाणांनी पक्ष का सोडला, हे तेच सांगू शकतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com