Vijay Wadettiwar : भुजबळांना विचारा काही दबाव आहे का?

Vijay Wadettiwar : भुजबळांना विचारा काही दबाव आहे का?

ओबीसी आरक्षण कसं महत्त्वाचं आहे हे छगन भुजबळ यांनी सांगितलं.
Published by  :
Siddhi Naringrekar

ओबीसी आरक्षण कसं महत्त्वाचं आहे हे छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसंच आपल्या भाषणात मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुजबळांनी जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, भुजबळांना विचारा काही दबाव आहे का? गावागावात वाद पेटल्यास कोण जबाबदार? अलीकडे सत्ताधारी समस्या मांडतात. भुजबळांच्या वक्तव्याचे समर्थन नाही. शरद पवार महाराष्ट्राचे नेते काँग्रेसचं नेते नाही. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये. कोण कुठे? लवकरच सर्वांना समजेल. विष पेरणारे राज्यकर्ते झालेत. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com