नवाब मलिक आमच्यासोबत नाही हे दाखवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न; वडेट्टीवारांची टीका

नवाब मलिक आमच्यासोबत नाही हे दाखवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न; वडेट्टीवारांची टीका

नवाब मलिक अजित पवार गटात पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना खुले पत्र लिहीले आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर बसले. यावरून मलिक अजित पवार गटात पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना खुले पत्र लिहीले आहे. सत्ता येते जाते, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, असे म्हणत नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांनी विरोध केला आहे. यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक आमच्यासोबत नाही हे दाखवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न; वडेट्टीवारांची टीका
फडणवीसांचा मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध; थेट अजित पवारांना लिहीले खुले पत्र, म्हणाले...

विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवाब मलिक यांना पुरवणी मागण्यात निधी दिला आहे. आता जे ट्विट केले, ते आमच्या बरोबर नाहीत म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न असेल. महायुती आमदार यांना जसे निधी दिला तसे त्यांना ही मिळालं. भाजपवर आरोप होऊ नये म्हणून हे ट्विट केले आहे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

तसेच, या पत्रात देशद्रोही म्हणून उल्लेख केला. देशद्रोही माणूस बाजूला बसला तर प्रश्न निर्माण होईल. सोबत ही हवेत, पण जवळ ही नको असा हा प्रकार आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र देऊन अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे ते महायुती बरोबर आहेत. नवाब मलिक कुठे राहतील हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असेही वडेट्टीवारांनी सांगितले.

दरम्यान, नवाब मलिकांवरुन फडवीसांनी अजित पवारांना कडक शब्दात पत्र लिहीले आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही, असे फडणवीसांनी पत्रात म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com