सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचंय; मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओवर विरोधकांचा निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका पत्रकार परिषदेतील हा व्हिडीओ असून यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचंय, असा निशाणा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर साधाला आहे.

काय आहे व्हिडीओत?

पत्रकार परिषदेला बसताना एकनाथ शिंदेंनी आपल्याला काय? बोलायचंय आणि निघून जायचंय. बोलून मोकळं व्हायचं. एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर अजित पवार हो……येस असं बोलताना दिसून येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी माईक चालू आहे. असे म्हणत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचंय, जनतेच्या प्रश्नांना- समस्यांना उत्तरे द्यायचे नाही. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे "नाकर्ते सरकार" राज्याचा कारभार हाकत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com