Vijay Wadettiwar : पिवळं वादळ अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही

Vijay Wadettiwar : पिवळं वादळ अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही

जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतून विजय वडेट्टीवार बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्हाला धमकी दिली तर पदापेक्षा समाजासाठी लढू. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत कुणाची होणार नाही. पिवळं वादळ अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही. मोठ्या भावानं मोठ्या भावासारख वागावं. पद महत्वाचे नाही, समाज महत्वाचा.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही. लहान भावाच्या ताटातलं काढाल तर तुमची जागा दाखवू. तुमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावता कामा नये म्हणून तुम्ही आलात. आमच्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावून देणार नाही. लेकरांच्या नावानं लोकांना बनवू नका. आम्हाला आमचा ओबीसी समाज महत्वाचा. ज्यांची संख्या जितकी त्यांना तितका वाटा. तुम्ही म्हणता पिढ्यान पिढ्या जमिनी कमी झाल्या, 20 एकरच्या 5 एकर झाल्या. पण ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत. ज्याच्याकडे 2 एकर जमीन नाही, तो कुठे असेल? याचा विचार तुम्ही करणार नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

ओबीसींचे आरक्षण म्हणजे संविधानिक अधिकार. द्वेष आणि विष पसरवण्याचे काम सुरु आहे. छगन भुजबळ ओबीसींचा बुलंद आवाज. अंबडची सभा तुंबड झाली. आता जिल्हा, जिल्हयात सभा घ्यावी लागेल. पंतप्रधानांना विनंती करायला जाऊ, एकदा जातनिहाय जनगणना करु. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com