Vijay Wadettiwar : पवारांचे वक्तव्य स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतं
शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट होत नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वड्डेटीवार म्हणाले की, शरद पवार यांचा वक्तव्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारला तर बरं होईल. आज राजकारण अस्थिर झालं आहे. शब्दावर आश्वासनावावर विश्वास कोणी ठेवू शकत नाही भाजपने राजकारण नासवलं आहे. जनतेचा विश्वास घात केला, त्यांना जनता जागा दाखवेल, निवडणूक मैदानात स्पष्ट होईल, त्या पक्षाबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. शरद पवार हे मोठे नेते आहे, कोर्टात केस सुरू होईल म्हणून त्यांच्या स्ट्रॅटेजीचा तो भाग असू शकतो. प्रत्येक पक्ष काम करताना अनेकदा शेवटच्या क्षणी फूट पडते, त्यावर ते आपला प्लॅन बी ठेवतात, कोण कुठं जातं हे निवडणुकीत स्पष्ट होईल.
आम्हाला धोका वाटण्याचं कारण नाही, शेवटचा एकच उत्तर असेल, निवडणुकीच्या तारखेपर्यंत जे ठरेल ते त्यावेळी परिस्थिती दिसेल. स्वार्थामुळे अनेक जण बरबटलेले आहे, लोकांशी देणं घेणं राहिलं नाही, निवडणुकीतच चित्र स्पष्ट होईल.