Vinayak Mete
Vinayak Meteteam lokshahi

विनायक मेटेंच्या अपघात प्रकरणी फरारी ट्रक चालकाला गुजरातमध्ये अटक

पोलिसांचं मोठं यश
Published by :
Shubham Tate

vinayak mete : मराठा समाजाचे प्रमुख नेते आणि शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचे रस्ते अपघातात निधन झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसला सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस स्टेशन परिसरातील माडप बोगद्याजवळ पहाटे ५.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. (vinayak mete accident truck driver arrested from gujarat big success of police)

Vinayak Mete
राष्ट्रवादीची खाती भाजपाकडे; शिंदे गटाला काय?, खातेवाटपाचं वैशिष्ठ्यं

विनायक मेटे यांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला गुजरातमधील दमन या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. हा ट्रक पालघरमधील असून ट्रक मालकाने ट्रक चालकाची ओळख पटवली आहे. विनायक मेटे यांचा आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता, त्यातच त्यांचे निधन झाले. हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

अपघाताच्या वेळी कारमध्ये आणखी एक व्यक्ती आणि त्याचा चालक होता, असे त्यांनी सांगितले. माडप बोगद्याजवळ त्यांची कार एका वाहनाला धडकली आणि सर्वजण गंभीर जखमी झाले. या सर्वांना नवी मुंबईतील कामोठे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता मेटे यांना मृत घोषित करण्यात आले.

Vinayak Mete
एक मंत्री नॉट रिचेबल, खातेवाटपानंतर शिंदे गटातील 5 मंत्री नाराज

मेटे हे मराठा समाजाच्या आरक्षणाचे कट्टर समर्थक होते. ५२ वर्षीय मेटे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही राहिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात पोहोचले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com