पोलिसी दंडुकेशहीच्या बळावर ग्रामस्थांना घाबरवलं जातंय; विनायक राऊतांनी सांगितली बारसूची परिस्थिती

पोलिसी दंडुकेशहीच्या बळावर ग्रामस्थांना घाबरवलं जातंय; विनायक राऊतांनी सांगितली बारसूची परिस्थिती

विनायक राऊत यांच्यासोबत ग्रामस्थांनी आज उध्दव ठाकरेंची भेट घेतली.

मुंबई : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन आणखी तापले आहे. अशात, विनायक राऊत यांच्यासोबत ग्रामस्थांनी आज उध्दव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकशाही मार्गाने ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. पोलिसी दंडुकेशाहीच्या बळावर ग्रामस्थांना घाबरवलं जात आहे. पोलिसी छावणीचे स्वरूप त्या ठिकाणी आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

पोलिसी दंडुकेशहीच्या बळावर ग्रामस्थांना घाबरवलं जातंय; विनायक राऊतांनी सांगितली बारसूची परिस्थिती
'कुटुंबापुरता विचार आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे'

बारसु सोलगाव आणि त्यासोबत तीन गाव या ठिकाणी रिफायनरी अमलात आणण्यासाठी महाराष्ट्र सारकरकडून ग्रामस्थांचा छळवाद सुरू आहे. लोकशाही मार्गाने ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. पोलिसी दंडुकेशहीच्या बळावर ग्रामस्थांना घाबरवलं जात आहे. पोलिसांच्या मदतीने लोकांना भीती दाखवली जात आहे.

मी काल ग्रामस्थांना जाऊन भेटून आलो. पोलिसी छावणीचे स्वरूप त्या ठिकाणी आहे. डॉक्टरकडे जायचं असेल तरी जाता येत नाही. मुंबईवरून चाकरमानी गावी जात आहेत, तर त्यांना गावात पोहचू देत नाही आहेत. पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत. रात्री अपरात्री पोलीस लोकांच्या घरी जात चौकश्या करत आहेत, असे विनायक राऊत यांनी म्हंटले आहे.

रिफायनरी विरोधी संघटना आहेत त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. पहिलं पत्र 7 सप्टेंबर 2022, दुसरं पत्र 22 डिसेंबर 2022 व तिसरं पत्र 15 जुलै 2022 रोजी दिलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत याना देखील पत्र देण्यात आली. मात्र, या पत्रांकडे मुख्यमंत्री उद्योगमंत्री यांनी लक्ष दिलेलं नाही.

तेथील स्थानिकांनी 7 वेळा आंदोलन केलं आहे. परंतु, कधी त्यांनी कायदा हातात घेतलेला नाही. त्या ठिकाणी पोलिसी छावणीचे स्वरूप आले आहे. महिला असतील, वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी महिला यांच्यावर लाठीचार्ज केला. नको त्या भागावर लाठीचार्ज केला. यासंदर्भात तक्रार त्या आंदोलकांनी केली आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

आज उद्धव ठाकरे यांची ग्रामस्थांनी भेट घेत त्यांच्यावरील हल्ल्यांचा पाढा वाचला. पत्रकारांना त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पहिल्यांदा जेव्हा माध्यमं त्या ठिकाणी गेली तेव्हा पत्रकारांना पकडून बाहेर काढलं. पत्रकारांना देखील सीमा आखण्यात आली आहे. तिथली वस्तुस्थिती काय आहे याचं वृत्तांकन करण्यास पत्रकारांना दिलं जात नाही आहेत.

सरकारला जर लोकांचं म्हणणं काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तिथली पोलिसी छावणी आहे ती हटवा. ग्रामस्थ सांगताहेत सरकारने चर्चेला यावं पण आधी पोलिसी छावणी हटवा. अभ्यासू कार्यकर्त्यांना हद्दपार करून आपल्या लोकांना प्रेझेंटेशन दाखवणं योग्य नाही. उद्धव ठाकरे लवकरच आपल्या प्रतिनिधींसोबत बारसू आणि जवळच्या पाच गावातील ग्रामस्थांची भेट घेणार आहेत, असेही राऊतांनी सांगितले आहे.

मागील महिन्यापर्यंत बारसू येथे 133 परप्रांतीय लोकांनी जमीन विकत घेतली आहे. भूमाफिया आहेत ते जमीन विकत घेत आहेत. मृत व्यक्तींचं बनावट कागद तयार करून जमीन घेतली जात आहे. खरं तर एखादा प्रकल्प येत असेल तर त्या ठिकाणी जमीन खरेदी विक्री करता येत नाही, असा मोठा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com