Vinayak Raut
Vinayak RautTeam Lokshahi

विनायक राऊतांची कदमांवर बोचरी टीका; म्हणाले, रामदास कदम हा कोडगा

मनसे सेटिंग करून चालणारा पक्ष

राज्यात सध्या विविध विषयावरून राजकीय वर्तुळात वादंग सुरु असताना, दसरा मेळाव्यावरून सुरु असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद आता उफाळून बाहेर येत आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे गट नेते रामदास कदम हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. त्यावरच आज शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी कदमांवर बोचरी टीका केली आहे.

Vinayak Raut
'PM मोदींसमोर तोंड उघडण्याची हिंमत फडणवीसांमध्ये नाही'

रामदास कदम यांना उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले की, रामदास कदम हा बाडगा आणि कोडगा आहे. त्याला आम्ही किंमत देत नाही. जनता त्यांना जागा दाखवून देईन. अश्या शब्दात त्यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.

Vinayak Raut
संजय राऊतांचा अडचणीत वाढ, न्यायालयाने पुन्हा वाढवली कोठडी

पुढे बोलताना विनायक राऊत यांनी मनसेवर देखील जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, मनसे म्हणजे सेटिंग करून चालणारा पक्ष आहे. स्वतःच्या घरात बसून बोलू नका अशी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली. सोबतच ते म्हणाले की, मनसे सध्या भाजपची पाठराखण करत आहे. प्रत्येक निवडणुकीत मनसेने कोणाची ना कोणाची तळी उचलली आहेत. अशी जहरी टीका यावेळी राऊत यांनी मनसेवर केली.

Lokshahi
www.lokshahi.com