वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांचे रस्त्याच्या खड्ड्यातील पाण्यात लावले फलक

वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांचे रस्त्याच्या खड्ड्यातील पाण्यात लावले फलक

सावंगी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात कार्यसम्राट आमदार पंकज भोयर यांचे फलक लावून निषेध व्यक्त केला.
Published by :
Dhanshree Shintre

भूपेश बारंगे, वर्धा | सावंगी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात कार्यसम्राट आमदार पंकज भोयर यांचे फलक लावून निषेध व्यक्त केला. सावंगी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले जात आहे .यामुळे नागरिकांना आणि रुग्णांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. उबाठा युवासेनेचे शादिल वांदिले यांनी अनोखा आंदोलन करून आमदार पंकज भोयर यांचा निषेध व्यक्त केला आहे.

कार्यसम्राट आमदार पंकज भोयर हे वर्धा विधानसभेचे दहा वर्षांपासून आमदार आहेत. मात्र या रस्त्याकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने युवा सेनेकडून निषेध व्यक्त केला जात आहे. रस्त्यावरील खड्ड्याच्या पाण्यात भाजप पक्षाचे बॅनर आणि कार्यसम्राट आमदार पंकज भोयर यांचे बॅनर लावून अनोख आंदोलन करून निषेध केला आहे.

या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने रस्त्यावरील तात्काळ सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याचे लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे युवा सेने नेत्यांनी इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com