पहिल्यांदा भाषण करताना कोणता सल्ला बाळसाहेबांनी दिला होता? राज ठाकरेंनी सांगितले
मुंबई : मुंबईतील व्हिजेआयटी कॉलेजच्या रंगवर्धन या सांस्कृतिक कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या काही आठवणी विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या. पहिल्यांदा भाषण करताना काय वाटले हेही राज ठाकरेंनी सांगितले. मी भाषणासाठी उभे राहतो तेव्हा माझे हात पाय थंड असतात, असे त्यांनी म्हंटले.
माझे वडील संगीतकार होते, माझ्या वडिलांची इच्छा होती मी संगीतात काही करावं. पण, त्यांना कळलं की मला राग कुठे येतो. मला जेवढ्या गोष्टीची गरज आहे तीच मी वाचतो. आमच्याकडे जेजे स्कूलमध्ये निवडणुका व्हायचा तेव्हा प्रत्येकाची कला समोर यायची, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मी भाषणासाठी उभे राहतो तेव्हा माझे हात पाय थंड असतात मला माहित नसतं मी काय बोलणार आहे. मी ठरवून काही भाषण करत नाही त्याला फारसं फॉलो करू नका. मी पहिल्यांदा भाषण केले होते तेव्हा मीनाताई आल्या आणि त्या बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेल्या.
१९९१ सालची ही गोष्ट आहे फोनवरून बाळासाहेब भाषण ऐकत होते. त्यांनी सांगितले जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल आपण किती शहाणे आहेत. हे नको सांगू लोक कसे शहाणे होतील ते सांग. तसेच, बाळासाहेबांनी सांगितले की मी माझ्या करिअरची सुरुवात बाळ ठाकरे अशी केली. तू राज ठाकरे अशी कर (स्वरराज नाव) बायको हा आपला शब्द नाही, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.