वेदांता-टाटा एअरबस प्रकल्प कोणामुळे राज्याबाहेर गेले? एकनाथ शिंदे म्हणाले...

वेदांता-टाटा एअरबस प्रकल्प कोणामुळे राज्याबाहेर गेले? एकनाथ शिंदे म्हणाले...

वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ राज्यातून चार मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ राज्यातून चार मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर, सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीच्या काळातच प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पर्सनल अजेंडा नाही. लोकांच्या हिताचे निर्णय घेणार, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

वेदांता-टाटा एअरबस प्रकल्प कोणामुळे राज्याबाहेर गेले? एकनाथ शिंदे म्हणाले...
सरकारने डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यासाठी आनंद सोहळा आहे. सातत्याने मेसेज यायचे. भरती कधी होणार?, नोकरी कधी मिळणार? अखेर देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. आम्हीही ७५ हजार नोकर भरतीची घोषणा केली आहे. हा पहिला टप्पा आहे. पुढे आणखी नोकऱ्या उपलब्ध करणार आहोत. टप्प्याटप्प्याने भरती सुरु राहील, असेही त्यांनी म्हंटले आहे. जपानच्या कंपनीने बीकेसीत २ हजार ६७ कोटींमध्ये जागा घेतली आहे. ते ५०० कोटी खर्च करणार आहेत. यामधून पाच ते सहा हजार लोकांना नोकऱ्या मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली.

दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आलं आहे. त्यातून सत्य समोर येईल. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडलं आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे. राज्य सरकारमागे केंद्र सरकार असून मोठ्या प्रमाणात निधी विकासासाठी मिळत आहे. केंद्राकडे १४ हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. तसाच्या तसा तो मंजूर केला. एकही पैसा कमी केला नाही, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.

वेदांता-टाटा एअरबस प्रकल्प कोणामुळे राज्याबाहेर गेले? एकनाथ शिंदे म्हणाले...
गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले; दोन टप्प्यात होणार मतदान

गेल्या तीन महिन्यात वातावरण बदलले आहे. सण-उत्सव लोकांना हवे असल्याने निर्णय घेतला व ते धूमधडाक्यात साजरे झाले. एक नकारात्मकता होती, ती दूर केली. दोघेच होतो तरी धडाधड निर्णय घेतले. मंत्रिमंडळ लवकरच होणार आहे. अधिकारी हे निर्णय लोकांपर्यंत पोहचवत असतात. चांगले निर्णय घेतले तरी ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. सगळ्या घटकांना मदत करत आहोत. आमचा पर्सनल अजेंडा नाही. लोकांच्या हिताचे निर्णय घेणार, असा टोला एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com