Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh KoshyariTeam Lokshahi

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होणार?

आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या या विधानाचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त केला जात होता. तर राज्यपालांना पदमुक्त करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत होती. त्यांच्या या विधानाचे पडसाद आजही दिसून येत आहे. त्याच दरम्यान आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Bhagat Singh Koshyari
त्यांनीच जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगावी; फडणवीसांचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर

राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली होती.

पदमुक्त होण्यासाठी राज्यपालांसमोर हा पर्याय?

आपल्या पदाचा राजीनामा अथवा पदमुक्त होण्याबाबतचे पत्र राज्यपालांना राष्ट्रपतींना पाठवावे लागेल. त्यानंतर त्यांच्या पत्रावर कार्यवाही होईल. केंद्र सरकारकडून राज्यपाल यांची बदली होऊ शकते. मात्र, ही बदली होणे म्हणजे राज्यपालांवरील कारवाई करण्यात आली, असे संकेत जाऊ नये म्हणून राज्यपाल स्वतःच राष्ट्रपतींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com