Yashomati Thakur : बाप्पाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी काँग्रेसचं सरकार स्थापन होणार

Yashomati Thakur : बाप्पाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी काँग्रेसचं सरकार स्थापन होणार

कॉंग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केलाय.
Published by  :
Siddhi Naringrekar

सुरज दहाट, अमरावती

कॉंग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केलाय. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी काँग्रेसचं सरकार स्थापन झालेलं असणार आहे.

राज्यात सुरू असलेला वेडेपणा आहे. 99 टक्के सत्ताधारी राजकारण करीत आहे. तर आम्ही समाजकारणाच्या जवळ आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी काँग्रेसचं सरकार येणार असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

यासोबतच त्यांनी बारामती अ‍ॅग्रो प्लांटवरील कारवाईवर बोलताना म्हणाल्या की, हा सत्ता कारणांसाठी गोंधळ आहे. रोहित पवार अॅक्टिव्ह झाले आहेत. स्वतः रोहित पवार हे सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या सोबत महाराष्ट्रभर फिरत आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी भाजपच काम असेल किंवा त्यांच्या परिवारातील असेल. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com