संभाजी भिडेंना अटक करून महाराष्ट्रासह देशातून तडीपार करा; यशोमती ठाकूर आक्रमक

संभाजी भिडेंना अटक करून महाराष्ट्रासह देशातून तडीपार करा; यशोमती ठाकूर आक्रमक

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या असून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. या विधानावरुन विरोधक संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभमीवर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या असून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिंडे यांना अटक करून त्यांना महाराष्ट्रसह देशातून तडीपार करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संभाजी भिडेंना अटक करून महाराष्ट्रासह देशातून तडीपार करा; यशोमती ठाकूर आक्रमक
मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ही एक मोठी विकृती समाजामध्ये पसरविण्याचे हे षडयंत्र आहे. हे लोक आरएसएसवाले आहेत. मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस स्वतःला संभाजी भिडे म्हणवून घेतात आणि असे विचित्र विधान करतात. हे सहन केले जाणार नाही. या विकृतीला कुठेतरी संपवावे लागले, असे म्हणत गृहमंत्री त्यांच्यावर गुन्हा का दाखल होऊ देत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहे व त्यांचं अमरावती आजोळ आहे. त्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. राष्ट्रपित्याबाबत असं म्हणणं हे यांना कसं सहन होते? तसेच, तुमच्या, आमच्यासारख्या सर्वांकडे ऑडिओ आहे. परंतु, त्यांना मिळत नाही. पोलिसांनी व गुप्तचर विभाग झोपलं आहे का? गृहमंत्री आणि पोलिसांनी जबाबदारीने वागणं गरजंचे आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

राज्य सरकारचं भिडेंना पाठीशी घालत आहे. नसेल तर संभाजी भिडे यांना अटक करून गुन्हे दाखल करा. संभाजी भिडे यांना अटक करून त्यांना महाराष्ट्रसह देशातून तडीपार करा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना अश्रू अनावर झाले होते. आपला समाज इतका विकृत कसा झाला की विचारांचा द्वेष विचारांनी न करता त्या विचाराच्या व्यक्तीच्या आई-वडिलांबाबत तुम्ही अपमानजनक बोलता. ही चिंतेची गोष्ट आहे. आम्ही आमचं दु:ख जिरवू शकतो. आम्हाला यावर स्पष्टता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राची जनता हे ऐकून बसून राहिली, गप्प बसून राहिली आणि हसतेय. याची चिंता असायला हवी. याचं मला दु:ख आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com