Happy Friendship Day Wishes 2025 : 'ही दोस्ती तुटायची नाय'; आपल्या मित्र-मैत्रणींना द्या फ्रेंडशिपच्या 'या' खास शुभेच्छा...

Happy Friendship Day Wishes 2025 : 'ही दोस्ती तुटायची नाय'; आपल्या मित्र-मैत्रणींना द्या फ्रेंडशिपच्या 'या' खास शुभेच्छा...

मैत्रीच्या खास शुभेच्छा: 'ही दोस्ती तुटायची नाय', फ्रेंडशिप डे 2025 साठी!
Published by :
Riddhi Vanne
Published on

कुठलंही नातं नसताना आयुष्यभर साथ देते ती मैत्री

रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात आणि तुला याची खात्री आहे, यालाच मैत्री म्हणतात

मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,

एक वेळेस ती भांडणारी असावी,

पण कधीच बदलणारी नसावी...

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,

रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करु शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री...

एक भास जो कधीही दुखावत नाही, आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com