सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लाँग मार्च; आजचा सातवा दिवस

आज लाँग मार्चचा आजचा सातवा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

खालिद नाज, परभणी

सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणी येथून मुंबईच्या दिशेने लाँग मार्च निघाला आहे. आज लाँग मार्चचा आजचा सातवा दिवस आहे.

हा लाँग मार्च आज जालना जिल्ह्यातून प्रवास करत असून जालना जिल्ह्यातील राममूर्ती येथे आज हा लाँग मार्च मुक्कामी असणार असल्याची माहिती मिळत आहे.

18 फेब्रुवारीला मंत्रालयावर हा लाँग मार्च धडकणार असून, न्याय मिळाला नाही तर मुंबईत ठिय्या आंदोलन करू असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com