Singer Anandi Joshi : दुसऱ्याला पाठवायचा होता पण तो मेसेज तिलाच सेंड झाला! बालरोगतज्ज्ञाची कमेंट वाचून गायिका म्हणाली , “कलाकार असलो म्हणून..."

Singer Anandi Joshi : दुसऱ्याला पाठवायचा होता पण तो मेसेज तिलाच सेंड झाला! बालरोगतज्ज्ञाची कमेंट वाचून गायिका म्हणाली , “कलाकार असलो म्हणून..."

मराठी गायिका आनंदी जोशी हिने सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार उघड करत पुण्यातील एका डॉक्टरवर गंभीर आरोप केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मराठी गायिका आनंदी जोशी हिने सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार उघड करत पुण्यातील एका डॉक्टरवर गंभीर आरोप केला आहे. बाणेर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ प्रभुदेसाई यांनी तिच्या फोटोवर अश्लील टिप्पणी करत ती चुकून थेट गायिकेलाच पाठवली. आनंदी जोशीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या घटनेची माहिती दिली. एका फोटोवर "हिचे क्लिवेज बघ किती डिप आहे" अशी आक्षेपार्ह टिप्पणी संबंधित डॉक्टरने केली होती. ही कमेंट त्याने कोणालातरी पाठवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती चुकून गायिकेच्या इनबॉक्समध्ये गेली.

प्रसिद्ध गायिकेची प्रतिक्रिया

ही घटना सार्वजनिक करताना आनंदी जोशीने लिहिले, “कलाकार असलो म्हणून कोणालाही आमच्याशी अशा प्रकारे वागण्याचा अधिकार नाही. आम्हीही माणूस आहोत.” तिने यासोबतच डॉक्टरचा फोटो, नाव आणि क्लिनिकचा पत्ताही जाहीर केला. संबंधित डॉक्टरने पूर्वी तिच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती आणि तिला कौतुकाचे मेसेजेस देखील पाठवले होते, असेही तिने नमूद केले.

डॉक्टरची ओळख आणि गंभीर चिंता

संबंधित व्यक्तीचा पेशा बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे ही घटना अधिक गंभीर असल्याचे आनंदीने म्हटले. तिच्या म्हणण्यानुसार, “जो व्यक्ती एका महिलेला एक व्यक्ती म्हणून न पाहता तिच्या शरीरावर अशी टिप्पणी करतो, त्याच्याकडे लहान मुलांचा स्पर्श करण्याचा अधिकार असावा का, हा प्रश्न निर्माण होतो.”

पालकांना सावध राहण्याचे आवाहन

या प्रकारानंतर आनंदीने पालकांना आपल्या मुलांच्या डॉक्टरांविषयी सतर्क राहण्याचे आवाहन केले. “हे असे लोक आहेत, ज्यांच्यात महिला, मुले आणि प्राण्यांविरुद्ध गुन्हे करण्याची क्षमता असू शकते. आपण त्यांच्या वागणुकीकडे दुर्लक्ष न करता त्यांना वेळेत ओळखले पाहिजे,” असंही ती म्हणाली.

सामाजिक प्रतिक्रिया आणि पुढील पावलं

या प्रकरणावर अनेकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, संबंधित डॉक्टरविरोधात वैद्यकीय परिषदेकडे तक्रार करण्याची मागणीही होत आहे. मात्र अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत कारवाई झाल्याचे वृत्त नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com