मार्चमध्ये म्हाडाच्या 8 हजार घरांची लॉटरी
गेल्याच महिन्यात म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांची लॉटरी जाहीर झाली. त्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मार्च महिन्यात घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी येत्या आठवड्याभरात जाहीरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाच्या सुमारे 4 हजार घरांपैकी 2 हजार 600 घरं ही गोरेगाव पहाडी परिसरात आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ही घरं बांधली जात आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची अंदाजे किंमत 35 लाख रुपये आहे.
म्हाडा प्राधिकारणाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या प्रत्येकी 4 हजार अशी एकूण आठ हजार घरांसाठी लॉटरी मार्च महिन्यात निघणार आहे. ही घरे सर्व सुविधांनी सज्ज अशी असणार आहेत. तर मुंबईमधील उर्वरित ठिकाणांवरील घरांचा समावेशही मुंबई मंडळाच्या लॉटरीत केला जाणार आहे. कोकण मंडळाची ही घरं ठाणे, वसई, विरार, पालघर, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यांत असणार आहेत. यात मुंबई मंडळाच्या लॉटरीत गोरेगाव पहाडी येथे सर्वाधिक घरांचा समावेश आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत यंदा महत्वाची बाब म्हणजे, मार्च महिन्यात निघणाऱ्या या लॉटरीत अत्यल्प आणि अल्प आर्थिक उत्पन्न गटातील सर्वाधिक घर आहेत.