Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

भोंगे वाद : दुसऱ्या दिवशी काय आहे राज्यात परिस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (Maharashtra Navnirman Sena) मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांच्या आवाहनानंतर कालपासून आंदोलन सुरु केलं आहे. राज ठाकरे यांनी जोपर्यंत मशिदीवरील भोंगे निघत नाही, तोपर्यंत हनुमान चालीसा होणार असल्याचे काल पुन्हा स्पष्ट केले. आज दुसऱ्या दिवशी काय परिस्थिती आहे, वाचा राज्यभरातील बातम्या...

मनसे पदाधिकाऱ्यास विदेशातून धमकी

रत्नागिरी-

मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी विदेशातून धमकीचा फोन आला. मनसेने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अन्यथा घरात येवून मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत वैभव खेडेकर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहे.

पंढरपुरात उतरवले भोंगे

सामाजिक सलोखा राखण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील अनवली मधील मुस्लिम बांधवांचा पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः उतरवले अनवली मधील मशिदींवरील भोंगे उतरवले. पोलीस पाटील तौफिक शेख यांनी ही माहिती दिली.

भिवंडीत पहाटेची अजान झाली शांत

भिवंडी शहरातील 155 मस्जिदीं मधून पहाटे सव्वा पाच वाजता होणाऱ्या फजरच्या नमाज वेळी लाऊडस्पीकर वरील भोंग्यावर अजान वाजविणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात 96 सुन्नी, 40 देवबंदी, 16 अहले हदीस, 2 शिया व 1 बोहरी अशा एकूण 155 मशिदी आहेत. भोंग्यांवरून राजकारण तापले असून त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना भिवंडीत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मशिदींचे मौलाना, विश्वस्त यांची बैठक घेऊन सामंजस्याने कायद्याचे पालन कारावे, असे आवाहन केले होते.

कोल्हापूरात मोहीम

कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून अनधिकृत भोंग्यां विरोध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणावर भोंग्याविरोधात सह्यांची मोहीम सुरु केली. सह्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com