LPG Gas Price Cylinder Hike
LPG Gas Price Cylinder Hike

LPG च्या दरात मोठी कपात, गॅस सिलेंडर झाले स्वस्त!

एकीकडे पेट्रोल-डिझलचे (Petrol Diesel Price) दर स्थिर असताना आता एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinders) दरात मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आज तब्बल १९८ रुपायंनी घट झाली आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

एकीकडे पेट्रोल-डिझलचे (Petrol Diesel Price) दर स्थिर असताना आता एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinders) दरात मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आज तब्बल १९८ रुपायंनी घट झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरात ही कपात करण्यात आली असून इंडियन ऑइलने १ जुलै रोजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, मुंबईत १९ किलोचा व्यवसायिक सिलिंडर आता १९८१ रुपयांचा झाला आहे.

जाणून घ्या आजचे नवे दर

दिल्लीत 30 जूनपर्यंत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2219 रुपयांना मिळत होता. ज्याची किंमत 1 जुलैपासून 2021 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये 2322 रुपयांच्या तुलनेत आता हा सिलिंडर 2140 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2171.50 रुपयांवरून 1981 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 2373 रुपयांवरून 2186 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तेल कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1003 रुपयांना मिळत आहे.

200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी

सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.

300 रुपयांहून अधिक कपात

गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या दरात 300 रुपयांहून अधिक कपात झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत वाढले होते. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल 19 मे रोजी करण्यात आला होता.

घरगुती एलपीजी ग्राहकांचे काय?

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com