सीमावाद; बुलढाण्यातील 4 गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय
Admin

सीमावाद; बुलढाण्यातील 4 गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय

राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. राजकीय वातावरण तापले आहे.

राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता मध्य प्रदेश सीमावाद प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यास असमर्थ असल्यानं जिल्हा प्रशासनाचा निषेध करत बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवरील चार गावांनी मध्य प्रदेशात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अशी माहिती मिळत आहे की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असतानाच बुलढाण्यातील चार गावांच्या मध्यप्रदेशात विलिन होण्याच्या मागणीनं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. काल आपलं निवेदन सादर केल्यानंतर चारही गावातील नागरिकांनी राज्य सरकार आणि बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

बुलढाण्यातील 4 गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. गावात मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होऊन निर्णय घेतला. अशी माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com