महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढणार; ठाकरे गटाच्या किती जागा?; सर्वाधिक जागा कुणाला? वाचा

महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढणार; ठाकरे गटाच्या किती जागा?; सर्वाधिक जागा कुणाला? वाचा

महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे.

महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे. यासाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे.मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहे. त्यापैकी ठाकरे गट 4 जागा लढणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाल्यानंतर अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.महाविकास आघाडीने कोणत्याही परिस्थितीत भाजपला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. 48 जागांपैकी शिवसेनेला 21, राष्ट्रवादीला19 आणि काँग्रेसला 8 जागा मिळणार आहेत. असा फॉर्म्युला ठरला आहे.

विधान परिषद आणि पोटनिवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत नेत्यांमध्ये एकत्र निवडणूक लढण्यावर एकमत झालं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com