ताज्या बातम्या
बीड जिल्हा कारागृहातून महादेव गीतेला दुसरीकडे हलवलं; सुरेश धस म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला बीड तुरुंगात मारहाण झाली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला बीड तुरुंगात महादेव गीतेच्या टोळीकडून झालेल्या मारहाणीनंतर आता महादेव गीते याची रवानगी दुसऱ्या कारागृहात करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस म्हणाले की, महादेव गीते पाठवला, एक टीम छत्रपती संभाजीनगरला पाठवला, एक टीम कुठे पाठवता पुण्याला. मग वाल्मिक कराड जावई आहे का जेलचा? त्यांना इथे का ठेवलं. त्यांना अमरावती किंवा नागपूरला पाठवा ना.