Sunil Tatkare Press Conference
Sunil Tatkare Press Conference

परभणी लोकसभेच्या रिंगणात उतरणार महादेव जानकर, सुनील तटकरेंकडून उमेदवारी घोषित; म्हणाले, "हा निर्णय घेण्याआधी..."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
Published by :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. महायुतीकडून परभणी लोकसभेसाठी महादेव जानकर यांना उमेदवारी दिल्याचं तटकरेंनी जाहीर केलं. तटकरे म्हणाले, परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून रासपला देण्यात येणार आहे. जानकर महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. जानकर मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.

माध्यमांशी बोलताना तटकरे पुढे म्हणाले, रायगड, शिरुरमधील उमेदवारांची आधीच घोषणा करण्यात आलीय. जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. नाशिकच्या जागेबाबत आमची वेट अॅण्ड वॉच भूमिका आहे. नाशिकच्या जागेबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. मराष्ट्रात धनगर आरक्षण असेल, इतर काही प्रश्न असतील, ते सोडवण्यात जानकरांचा मोठा वाटा आहे. जानकर १ एप्रिलला परभणीतून अर्ज भरणार आहेत. परभणी लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार म्हणून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. हा निर्णय घेण्याआधी आमची परभणीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. कोणत्याही प्रकारची शंका मनात न ठेवता आम्ही हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हितासाठी घेतला आहे.

आमच्या कोट्यातून रासपला देणार. जानकर महायुतीचे अधिकृत उमेदवार. राष्ट्रवादीच्या कोट्यातून जानकरांना परभणीची जागा. रायगड, शिरुरमधील उमेदवारांची आधीच घोषणा. जानकर मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार. परभणीतूनव ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्यात होणार लढत. नाशिकच्या जागेबाबत वेट अॅण्ड वॉच. या सर्व चर्चा झाल्यानंतर महादेव जानकर परभणीसाठी अधिकृत उमेदवार असतील, असं घोषित करतो. जानकरसाहेब मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा आमचा विश्वास आहे. भाजपाने २४ जागा जाहीर केल्या आहेत. शिंदे साहेब यांनी ८ जागा घोषित केल्या आहेत. आमच्या वतीने अजित पवार यांनी रायगड आणि शिरूर या जागा घोषित केल्या आहेत. आम्ही सात किंवा आठ जागा मागितल्या आहेत, असंही तटकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com