कालिचरण महाराजांच्या नेतृत्वात यवतमाळमध्ये महामोर्चा

कालिचरण महाराजांच्या नेतृत्वात यवतमाळमध्ये महामोर्चा

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये आज हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये आज हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आहे. कालिचरण महाराजांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, जातीयवाद तोडा, वर्णवाद तोडा, सनातनवाद जोडा… सगळ्या हिंदूंनी एक व्हावं आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करावा. असे ते म्हणाले.

आमदार निलेश नाईक यांनीही मोर्चात सहभाग घेतला आहे. ते म्हणाले की, श्रीराम चंद्राच्या कृपेने सकल हिंदु समाजाने हा मोर्चा काढल्याची प्रतिक्रिया निलेश नाईक यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहाद तसेच धर्मांतराच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.

लव्ह जिहाद, गो हत्या बंदी, धर्मांतर कायद्याच्या मागणीसाठी हा हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. पुसद येथील शिवाजी चौक परिसरातून हा मोर्चा निघाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com