ताज्या बातम्या
मुंबईकरांना पुन्हा महागाईचा झटका! सीएनजी-पीएनजीचे दर वाढले, जाणून घ्या दर
मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा तिसरा धक्का बसला आहे.
मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा तिसरा धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर आता सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासू मुंबईत हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. पीएनजीसाठी 49 रुपये प्रति किलो तर सीएनजीचे दर 79.50 रुपये असतील.
सीएनजीचे दर 1.50 रुपये प्रति किलो प्रमाणं तर पीएनजीचे दर 1 रुपयानं वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाईपलाईन गॅसद्वारे दिल्या जाणाऱ्या गॅसचा दर 49 रुपये प्रति यूनिट असणार आहे.