मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची महापुजा संपन्न
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक पुजा केली.नाशिकच्या सटाण्याचे अहिरे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. बाळू अहिरे आणि आशा अहिरे यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला.
पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राज्यभरातून जवळपास 5 ते 6 लाख पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपूरप्रमाणेच राज्यभरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लाडक्या विठु माऊलीच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा आहेत.
आनंदाचे डोही आनंद तरंग... आनंदची अंग...आनंदची अंग... या अभंगाप्रमाणे पंढरपूररुपी आनंदाच्या डोहात विठ्ठल नामाचे आनंद तरंग उठताना दिसत आहेत. राज्यभरातून शेकडो किलोमीटरच्या प्रवास करून वारकऱ्यांचा महासागर पंढरपुरात दाखल झाला असून संपूर्ण पंढरपूर परिसर विठ्ठल-विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाल्याचं पाहयाला मिळतंय.