Monsoon Session : आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन

Monsoon Session : आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आज सकाळी ११ वाजता विधानसभा कामकाज होणार सुरु होणार आहे. तसेच 28 जूनला अजित पवार मांडणार अंतरिम बजेट सादर करणार आहेत. या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. आजपासून सुरु होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

कायदा-सुव्यवस्थेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला घेरणार असण्याची शक्यता आहे. अधिवेशनात 14 विधेयकं मांडली जाणार असून खासदार म्हणून निवडून गेलेल्या आमदारांच्या राजीनाम्याची आज घोषणा होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com