हिवाळी अधिवेशनात विधानभवनात धडकणार 21 मोर्चे

हिवाळी अधिवेशनात विधानभवनात धडकणार 21 मोर्चे

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • हिवाळी अधिवेशनात विधानभवनात धडकणार 21 मोर्चे

  • विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत 21 मोर्चेकरांनी घेतली परवानगी

  • मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

नागपूरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरात होणार आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. नागपुरात आता आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार असून पाच दिवसीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात जवळपास 21 मोर्चे विधिमंडळ परिसरात धडकणार असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत 21 मोर्चेकरांनी परवानगी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com