“तुम्ही सभागृह चालू देणार आहे हे माहितीच नव्हतं, अन्यथा मुख्यमंत्री हजर राहिले असते” - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“तुम्ही सभागृह चालू देणार आहे हे माहितीच नव्हतं, अन्यथा मुख्यमंत्री हजर राहिले असते” - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील अनुपस्थितीवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “प्रश्नोत्तराचा दुसरा आठवडा आणि दुसरा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील अनुपस्थितीवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “प्रश्नोत्तराचा दुसरा आठवडा आणि दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांकडे १४-१५ खाती आहेत. त्यांच्या खात्यासंबंधी प्रश्नांची उत्तरं शंभूराज देसाई, उदय सामंत देतात. उत्तरं कोणी द्यायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीसजी तुमच्याकडे सात ते आठ खाती आहेत. तुम्ही सगळ्या खात्यांसंबंधी उत्तरं देता. तुम्ही दुसऱ्या कोणाला उत्तर द्यायला सांगत नाही. तुम्ही तितके सक्षम आहात म्हणून देत असाल. तसेच फडणवीसजी तुम्हालाही आठवत असेल की, मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला हजर असले तर इतरांच्या उत्तरात हस्तक्षेप करत न्याय देऊ शकतात. आपण पाच वर्ष तसं करत होतात. ही एक परंपरा, पद्धत आहे. विधिमंडळाला न्याय, सन्मान आहे. आपण कायदे करतो, कायदेमंडळ आहे. कृपा करुन सरकार याची नोंद घेणार आहे का याचंही उत्तर द्या”,असे अजित पवार म्हणाले.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तुम्ही सभागृह चालू देणार आहे हे माहितीच नव्हतं, अन्यथा मुख्यमंत्री हजर राहिले असते” असा टोला लगावला. त्यावर सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हशा पिकला. आता सभागृह चालवत आहात तर मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो. आपलं म्हणणं योग्य असून मुख्यमंत्री उपस्थित राहतील. असे म्हटल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र या उत्तरामुळे अजित पवार संतापले आणि फडणवीसांना सुनावलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com