ATS Raid : महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रा येथून शिक्षकाला अटक, चार घरांवर छापेमारी

ATS Raid : महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रा येथून शिक्षकाला अटक, चार घरांवर छापेमारी

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) मुंब्रा (Mumbra) येथे मोठी कारवाई करत छापेमारी केली आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर आणि पुण्यातील अटकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे समजते.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई;

  • मुंब्रा येथून शिक्षकाला अटक, चार घरांवर छापेमारी

  • मुंब्र्यात ATS ची छापेमारी

  • electronic वस्तू जप्त, दोघांची कसून चौकशी.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) मुंब्रा (Mumbra) येथे मोठी कारवाई करत छापेमारी केली आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर आणि पुण्यातील अटकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे समजते. या प्रकरणी दोन जणांची कसून चौकशी करण्यात येत असून, मुंब्रा भागातील चार घरांवर एटीएसने छापे टाकले. एका शिक्षकाच्या घराचाही यात समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अल कायदाशी संबंधित एका इंजिनिअरला पुण्यातून अटक करण्यात आली होती, त्याच प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे'. या छाप्यात दोघांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून, त्याचे विश्लेषण केले जाणार आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर देशातील सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. दहशतवादी कनेक्शन असलेल्या काही आरोपींना पुण्यातून अटक केल्यानंतर त्यांची चाैकशीतून मुंब्रा येथील शिक्षकाचे नाव समोर आले होते. त्या शिक्षकाला एटीएसच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यानंतर चार घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेला शिक्षक हा जमाती इस्लामिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. एटीएसकडून त्याची अधिक चौकशी केली जात आहे.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या आवारात सोमवारी भीषण स्फोट झाला. त्या घटनेनंतर देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एटीएसने मुंब्रा परिसरात कारवाई तीव्र केली आहे. याचदरम्यान मंगळवारी जमाती इस्लामियाशी कनेक्शन असलेल्या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com