Maharashtra Board Exam
Maharashtra Board ExamTeam Lokshahi

Maharashtra Board Exam Time Table : दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम
Published by  :
Sagar Pradhan

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.

Maharashtra Board Exam
पुणे ग्रामपंचायत निकालात 'राष्ट्रवादी पुन्हा'

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी सोयीसाठी दिवाळी अगोदर हा वेळापत्रक बोर्डाने जाहीर केला.

Maharashtra Board Exam
नंदुरबार ग्रामपंचायतीत भाजपचेच वर्चस्व!

शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com