Maharashtra Budget session 2023 : विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर संतापले
Admin

Maharashtra Budget session 2023 : विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर संतापले

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात येत आहेत. कांदा प्रश्नावरून विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली आहे. बळीराजाला मदत करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा प्रकारच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. 

विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केला आहे. अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यावरुन सरकारला जाब विचारला.

यावेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर संतापले. ते म्हणाले की, कांदा उत्पादकांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यानंतर तत्काळ मदत करण्यात येईलशेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारचीही भूमिका आहे असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com